Tarun Bharat

मुंबईच्यामहापौर बनल्या कोविड योद्धय़ा

नायर रुग्णालयात पुन्हा परिचारिका बनून रुग्णांच्या सेवेत : कोरोनाविरुद्धची लढाई लवकरच जिंकणार!

दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:

 एखादी लढाई तेव्हाच जिंकता येते, जेव्हा राजा स्वत: प्रजेचा हुरुप वाढवतो आणि तेव्हा ती सर्व प्रजा शक्तीनिशी उतरून शत्रूचा सामना करते. अशाच पद्धतीने मूळ सिंधुदुर्गच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर या आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. पूर्वी परिचारिकेचे शिक्षण घेतले असल्याने आपल्या अनुभवाचा उपयोग करत त्या नायर रुग्णालयात मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे त्या नव्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी कोविड योद्धय़ाही ठरल्या आहेत.

  कोरोनामुळे संपूर्ण मुंबई चिंतेत आहे. तेथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. महापौर पेडणेकर या कोरोना लढय़ात स्वत: मैदानात उतरून दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सर्व वैद्यकीय सेवा, डॉक्टर्स, नर्स यांना विश्वासात घेऊन कोरोनाचा सामना त्या नियोजनबद्धरित्या करत आहेत. त्यांनी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही समस्या जाणून घेतल्या आहेत.

 त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक प्रभागवार अधिकारी, आरोग्य सेवा, लोकप्रतिनिधी, समाजसेवकांना बरोबर घेऊन उपाययोजना करून अंमलात आणल्या आहेत. वरळी, धारावीसारख्या ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने मिळाले, तेथे त्वरित प्रशासनासोबत भेट देऊन जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन स्वत: ध्वनीक्षेपकावरून केले होते. त्या सर्वांना मुंबई महानगरपालिका तुमच्यासोबत असल्याची सदैव जाणीव त्यांनी करून दिली होती. वैद्यकीय सेवा, पोलीस या सर्वांच्या कार्याचा किशोरी पेडणेकर प्रत्येक दिवशी आढावा घेत आहेत. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी त्यांनी अनेक प्लान बनविले आहेत.

Related Stories

शासकीय भात खरेदीवरील ५० टक्के बोनस रक्कम मिळणार तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर

Anuja Kudatarkar

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केल्याप्रकरणी एकास सात वर्षांचा तुरुंगवास

Anuja Kudatarkar

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

NIKHIL_N

चिपळुणातील सोने कारागिराचे दीड कोटीच्या ऐवजासह अपहरण

Patil_p

अणाव वृद्धाश्रमाच्या नव्या वास्तुचे 21 रोजी उद्घाटन

NIKHIL_N

भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर निरवडे येथे पलटी

Anuja Kudatarkar