Tarun Bharat

मुंबईतील धक्कादायक घटना;अत्याचार करुन केले ‘हे’ अमानवी कृत्य

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई

देशातील अनेक शहरात महिला अत्याचाराला बळी पडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबई येथील साकीनाका परिसरात घडली आहे. महिलेवर अत्याचार करुन गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. ही घटना आज 10 सप्टेंबर रोजी पहाटे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला स्थानिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणी एका संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी पोलीसांनी अजुन काही व्यक्ती सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच तपासाची चक्रे गतीमान केली असल्याचे ही पोलीसांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ही घटना साकीनाका परिसरातील खैरानी रोड परिसरात घडली आहे. पीडित महिला 30 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पहाटे साडे तीनच्या सुमारास साकीनाका परिसरात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचा फोन पोलीस कंट्रोल रुम आला होता. यावर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. यावर अधिक तपास सुरु असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

यादवनगरात सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून

Archana Banage

पुड्डुचेरी उपराज्यपालांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Patil_p

घंटागाडी ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली

Patil_p

कॅनडात कोरोना रुग्णांची संख्या 95 हजार पार

Tousif Mujawar

गरिबांना डिसेंबरपर्यंत मोफत धान्य

Patil_p

जम्मू लष्करी स्थानकाजवळ 2 अज्ञात ड्रोनचा वावर

datta jadhav
error: Content is protected !!