Tarun Bharat

मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या सुत्रधाराला 15 वर्षांचा तुरुंगवास

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकीउर रहमान लखवीला टेरर फंडिंगप्रकरणी लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

सन 2008 मधील मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानमध्ये 6 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर 2015 मध्ये लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली होती. दहशतवादविरोधी विभागाने शनिवारी दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून त्याला अटक केली होती. 

लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती. मुंबईतील हल्ल्यात 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 166 जणांना प्राण गमवावा लागला. तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.

Related Stories

101 वर्षीय मारिया यांची कोरोनावर 3 वेळा मात

Patil_p

सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेपाळमध्ये मतदान

Patil_p

डेटिंगचे कोचिंग देतेय मॉडेल

Patil_p

पूर्व लडाखमधून परतले 90 टक्के चिनी सैन्य

datta jadhav

…म्हणून चीननेही अडवले भारतातून निर्यात होणारे कंटेनर

datta jadhav

ब्राझील : ड्रग्ज माफिया आणि पोलिसांमध्ये चकमक; 28 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!