Tarun Bharat

मुंबईतून उड्डाण केलेल्या अलायन्स एअरच्या इंजिनचे आवरण कोसळले

ऑनलाईन टीम / मुंबई :

अलायन्स एअरच्या एटीआर विमानाने आज सकाळी मुंबईतून उड्डाण करताच इंजिनच्या वरचे आवरण धावपट्टीवर कोसळले. याची माहिती मिळाताच वैमानिकाने ते विमान ओडिशातील भूज येथे सुरक्षितपणे उतरवले. इंजिनचे वरचे आवरण कसे पडले, याची चौकशी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरू केली आहे.

मुंबई एअर ट्रफिक कंट्रोलरने (एटीसी) दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी अलायन्स एअरच्या एटीआर विमानाच्या उड्डाणादरम्यान विमानाचे इंजिन कव्हर धावपट्टीवर पडले आणि इंजिन कव्हरशिवाय विमानाने उड्डाण केले. उड्डाणानंतर वैमानिकाच्या ही बाब लक्षात येताच काही अंतर पार करुन हे विमान भूज विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. उड्डाणानंतर विमानाच्या इंजिनचा भाग पूर्णपणे उघडा होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Related Stories

वैकुंठवासी तात्यासाहेब वास्कर महाराजांच्या पत्नीचे दुःखद निधन

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 299 वर

Archana Banage

नवीन वर्ष कसे साजरे करणार ? महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन जारी!

Tousif Mujawar

बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले; अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू

Tousif Mujawar

…हा तर लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार : संजय राऊत

Tousif Mujawar

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचेही मत – संभाजीराजे छत्रपती

Archana Banage