Tarun Bharat

मुंबईतून पायी प्रवास करत आलेला तरूण क्वारंटाईन

Advertisements

प्रतिनिधी / खेड

कोरोनाच्या भीतीने मुंबईतून पायी प्रवास करत येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ थांबता थाबेनासा झाला आहे. चार दिवसापासून जीव धोक्यात घालत पायी प्रवास करत गावी दाखल झालेल्या ४० वर्षीय तरुणास गुरुवारी सायंकाळी उशिरा आरोग्य पथकाकडून क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. कोरोनाच्या लाकडाऊनमुळे कामधंदाच नसल्याने अन् गाठीला पैसेही नसल्याने चाकरमान्यांचे हाल सुरू असून रेल्वे ट्रॅकसह पायी प्रवास करत गाव गाठत आहेत. मूळचा देवधर-वाक्षेपवाडी येथील रहिवाशी असलेला व सध्या डोंबिवली येथे कामानिमित वास्तव्यास असलेल्या तरुणानेही पायी प्रवास करत गाव गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो चार दिवसापूर्वी प्रवासाला निघाला. हा तरूण गुरुवारी आपल्या गावीही दाखल झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून गावी आलेल्या या तरूणाने आपण आल्याबाबतची कल्पना पोलीस पाटील व सरपंच यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. आपणास क्वारंटाईन करावे, असेही दस्तुरखुद्द त्यानेच सांगितल्याचे समजते. त्यानंतर याबाबत आरोग्य प्रशासनास कळवल्यानंतर त्यास क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

Related Stories

वेत्ये येथील अपघातात २ दुचाकी चिरडल्या

Ganeshprasad Gogate

रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

Ganeshprasad Gogate

शाश्वत मानकर ठरला ‘राधाकृष्ण श्री 2022’चा मानकरी

Patil_p

‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर धक्काबुक्की

NIKHIL_N

मे 2020 मध्ये संपली आहे जिल्हा बँकेची मुदत

NIKHIL_N

उपरलकर देवस्थान अभिषेक उत्सव

NIKHIL_N
error: Content is protected !!