Tarun Bharat

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Advertisements

ऑनलाईन टीम /मुंबई

झोपडपट्ट्या आणि गजबजलेल्या परिसरात आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला (Firebriged) लवकरच फायरबाइक (Firebike) मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिका (Mumbai corporation) 3.15 कोटी (3.14 cr ) रुपये खर्च करून 24 बाईक खरेदी करणार असून यामध्ये त्यांच्या एकूण देखभाल खर्चाचा समावेश आहे. बुधवारी फायर बाईक खरेदीचा प्रस्ताव नागरी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये मांडण्यात आलेला हा प्रस्ताव कोव्हिड परिस्थितीमुळे प्रलंबित होता.

एका बाइकची किंमत 2.76 कोटी रुपये असुन पाच वर्षांसाठी सेवा आणि देखभालीसाठी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त 28.32 लाख रुपये खर्च करत आहे. या खर्चामध्ये बाईकचे असेंब्लींग आणि कमिशनिंग तसेच देखभाल यांचा समावेश असून वर्कऑर्डर दिल्यानंतर दोन महिन्यांत बाइक्सचा समावेश महानगरपालिकेच्या ताफ्यात केला जाईल असे BMCच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, फायर बाईकमध्ये पाण्याची टाकी, पाण्याचे पाइप, होज रील आणि पंप बसवण्यात येणार आहेत. बाईकमध्ये अग्निशमन उपकरणांसह सुमारे 40 लिटर पाणी वाहून नेऊ शकणार्‍या टाक्या बसवल्या जातील. या बाइक GPS यंत्राने चालवल्या जातील आणि बाईकला जोडलेला पंप एका मिनिटात 8 लिटर पाणी फवारण्यास सक्षम असेल. दोन अग्निशमन दलाचे जवान बाईकवर स्वार होऊ शकतील. अग्निशमन दल मोठ्या पाण्याचे टँकरसह टीम पोहोचण्यापूर्वी घटनास्थळी पोहोचू शकतात आणि परिस्थितीचे मूल्यांकन करून कमांड सेंटरला परत अहवाल देऊ शकतात.

Related Stories

गोव्याचा नवाब शेख ‘सूर नवा ध्यास नवा’च्या महाअंतिम फेरीत

Amit Kulkarni

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्या यांनी केलं ‘हे’ विधान

Abhijeet Shinde

टपालातील भाजी बियांची पाकिटेच जेव्हा गायब होतात..

Omkar B

Kolhapur; गणेशोत्सवात पंचगंगेत निर्माल्य विसर्जन नको; जि.प.प्रशासक संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

Abhijeet Khandekar

आर्या, आता ऑलिम्पिकमध्ये तू नेतृत्व करावे – मुख्यमंत्री

Patil_p

सातारा जिह्यात कोरोना केअर सेंटर सुरु

Omkar B
error: Content is protected !!