ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत गुरुवारी 998 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 579 वर पोहचली आहे. तर काल मुंबईत कोरोनामुळे 25 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 998 जणांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 16579 वर पोहोचले आहेत. तर आतापर्यंत 621 रुगांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत आता पर्यंत 17 हजार 377 रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता पर्यंत 4 हजार 234 रुगंची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.