Tarun Bharat

मुंबईत नाकाबंदीवर असलेल्या दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने वार

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोना संकटात जीवावर उदार होऊन काम करत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबायचे काही नाव नाही. पुन्हा एकदा मुंबईमध्ये नाकाबंदी करत असलेल्या दोन पोलिसांवर एका युवकाने हल्ला केल्याची घटना समोर येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह परिसरात एका 27 वर्षीय युवकाने काल रात्री दीड वाजता पोलिसांवर हल्ला केला. प्रदीप नायर असे या हल्लेखोराचे नाव आहे. या हल्लेखोराने पोलिसांच्या हातावर आणि खांद्यावर कोयत्याने सपासप वार केले. दरम्यान, हल्लेखोराला अटक केली असून जखमी पोलिसांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


याबाबत अधिक माहिती देताना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ म्हणाले की, प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अंड बोट क्लब जवळ काल रात्री काही पोलीस कर्मचारी नाकाबंदी चे काम करत होते. त्यावेळी एक तरुण हातात कोयता घेऊन येत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळून गेला. त्यावेळी त्याचा पाठलाग करत असताना त्यांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. 


पुढे ते म्हणाले, त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तो मनुष्य कोयता घेऊन का फिरत होता याबाबत तपास सुरू आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

बारावीचा ‘तो’ पेपर फुटला नाही

datta jadhav

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, तर ५२ हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Archana Banage

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रॅली रवाना

Rohit Salunke

झारखंडमध्ये बस आणि ट्रकची धडक : 16 ठार, 26 जखमी

Abhijeet Khandekar

ज्या वृत्ती विरुद्ध शाहू महाराज लढले, ती संपवली पाहीजे : मुख्यमंत्री ठाकरे

Abhijeet Khandekar

मुंबई : आयपीएल खेळण्याची संधी हुकल्याने युवा खेळाडूची आत्महत्या

Tousif Mujawar
error: Content is protected !!