Tarun Bharat

मुंबईत भाजपला धक्का; कृष्णा हेगडे शिवसेनेत

Advertisements

तरुण भारत न्यूज

मुंबईत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराठ ठोकत हाती शिवबंधन बांधले. आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी मुंबई पोलिसांना पत्र लिहून हेगडे यांनी केली होती. तसेच रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर कृष्णा हेगडे चर्चेत आले होते.

दरम्यान, कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे आहेत. विलेपार्ले मतदार संघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई महापालिकेच्या गत निवडणुकीपूर्वी हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर आरोप करत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.


कृष्णा हेगडे यांच्यासोबतच आज मनसे नेत्या जुईली शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकटावर निवडणूक लढवली होती. आज झालेल्या पक्षप्रवेशावेळी परिवहनमंत्री अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

Related Stories

कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी

Rohan_P

दिल्लीत दिवसभरात 79 नवे कोरोना रुग्ण; 154 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

जिल्हा परिषदेने विकासाभिमुख कामे करावीत : चंद्रकांत पाटील

datta jadhav

महाराष्ट्रात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

Rohan_P

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंदा कोचर यांच्या पतीला जामीन

Rohan_P

अखेर ‘एमपीएससी’ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Rohan_P
error: Content is protected !!