Tarun Bharat

“मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे विसरु नका”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पण काही व्यापार संघटनांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. तर विरोध करणाऱ्यांना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या भाषेत सुनावलं आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान व्यापार संघटनांनी निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. यावर संजय राऊत यांनी “विरोध करतो म्हणजे काय… तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात…तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?”, अशा शब्दांत सुनावलं आहे.

Related Stories

शरद पवारांच्या आवाहानावर फडणवीस म्हणतात, मी दौरा सुरूच ठेवणार

Abhijeet Shinde

‘मराठा आरक्षणावर सरकारचा अभ्यास नाही’

Abhijeet Shinde

`सीपीआर’ मधील वॉर्डमध्ये सदोष पीपीई कीट

Abhijeet Shinde

सोलापूर : कुर्डुवाडीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Abhijeet Shinde

”मी पोहचलो रे हिमालयात”; आव्हाडांचे पाटलांवर खोचक मीम

datta jadhav

राजीव सातव यांच्यासाठी राहुल गांधींनी केला डॉक्टरांना फोन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!