Tarun Bharat

मुंबईत 8 बेस्ट बसची तोडफोड

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

लखीमपूर खेरीतील शेतकरी हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून अज्ञातांनी मुंबईतील विविध भागात बेस्टच्या 8 बससह एका भाडेतत्त्वावरील बसची तोडफोड केली. त्यामुळे बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून, बंदच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडय़ा सोडण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले.

मुंबईतील धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध ठिकाणी अज्ञातांनी बेस्ट बसची तोडफोड केली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणाने बस चालविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाडय़ा चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासन दिली आहे.

Related Stories

विस्थापित काश्मिरी विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देणार, उदय सामंतांची घोषणा

Abhijeet Shinde

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत- प्रवीण तोगडिया

Abhijeet Shinde

सौदी अरेबियात कोरोनामुळे 11 भारतीयांचा मृत्यू

prashant_c

HSC RESULT; बारावीत कोकण ऑलवेज टॉप, मुलींची प्रथा कायम

Rahul Gadkar

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav
error: Content is protected !!