Tarun Bharat

मुंबईहून कोतीज येथे आलेल्या 10 जणांना केले संस्थात्मक क्वारंटाईन

प्रतिनिधी / कडेगाव

कोतिज (ता. कडेगाव) येथील मुंबईस्थित पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुंबईतील रुग्णालयातून सांगली जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली आहे.

याच कोरोनाबाधिताच्या दोन मुली, भाऊ, भावजय व पुतणी अशा एकूण पाच व्यक्ती 23 एप्रिल रोजी विना परवाना कोतीज येथे आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने मुंबईहून कोतीज येथे आलेल्या पाच जणांसह त्यांच्या कुटुंबातील इतर ५ जणांना आज रात्री उशीरा संस्थात्मक क्वारंनटाईन केले. कोतिजसह तालुक्यातील नागरिकांत पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोतीज येथील दोन भाऊ मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. तर त्यापैकी एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला जाणवू लागला. त्यामुळे ते मुंबई येथील रुग्णालयात गेले असता तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 एप्रिल रोजी त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी 1 मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. त्याची माहिती आज जिल्हा रूग्णालयाला दिली आहे.

दरम्यान, तालुका प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे, पोलिस प्रशासनाने कोतीज येथे जाऊन संबंधीत वस्ती सील केली आहे. तसेच गावातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर आरोग्य विभागाने मुंबईहून आलेल्या संबंधित कोरोना बाधीत रुग्णाच्या नातेवाईकांना कडेगाव येथील शासकीय विभागात ठेवले आहे.

Related Stories

बायोमेट्रीक सर्व्हेला झाला प्रारंभ

Patil_p

गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन द्या,अन्यथा आंदोलन

Archana Banage

सांगली : कोरोनाने दोघींचा मृत्यू, नवे ९ रूग्ण

Archana Banage

हुबळीत भीषण अपघातात ८ ठार, मृत्यूमधील ६ जण कोल्हापुरातील?

Rahul Gadkar

सातारा जिल्ह्यात 44 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 306 नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

कोल्हापूर नाक्यावर 460 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल होणार

Patil_p