तरुण भारत

मुंबईहून येणाऱ्या लोकांवर कर्नाटक सरकारचे विशेष कोविड पाळत ठेवण्याचे आदेश

बेंगळूर / प्रतिनिधी

राज्य सरकारने सोमवारी एक नवीन परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातून विशेषत: मुंबईहून येणाऱ्या लोकांसाठी विशेष पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

31 जुलै 2021 रोजीच्या परिपत्रकाची परिशिष्ट म्हणून जारी केलेले नवीन परिपत्रकानुसार, मुंबईसह महाराष्ट्रातुन कर्नाटकात रस्ते, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कोणत्याही वाहतुकीच्या मार्गाने (दोन दिवस किंवा त्याहून कमी) सर्व अल्प-मुदतीच्या प्रवाशांना लागू आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांनी परिपत्रकात म्हटले आहे की, “कर्नाटक आणि महाराष्ट्राने कोविड-19 च्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा दर्शवली असली तरी, कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात दैनंदिन रुग्ण दर किंचित जास्त आहे.” जर प्रवाश्यांनी राज्य सरकारने दिलेल्या निकषांचे पालन केले, तर अशा प्रवाश्यांना अनिवार्य अशा RT-PCR अहवालातून सूट दिली जाईल.

Advertisements

Related Stories

मच्छेत बाल शिवाजी वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

Omkar B

परिवहनच्या 195 कर्मचाऱयांची बदली

Amit Kulkarni

अंगणवाडी कार्यकर्त्यांचा अपमान टाळा

Amit Kulkarni

भू-संपादनविरोधात अनगोळ शेतकऱयांचा वैयक्तिक आक्षेप

Patil_p

मतदार नोंदणी जागृतीसाठी ‘कानडीचा वरवंटा’

Patil_p

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!