Tarun Bharat

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटी; वाहतूक विस्कळीत

Advertisements

मुंबई / ऑनलाईन टीम

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा अपघात झाला आहे. बोरघाटामध्ये उतरताना एक गॅस टँकर एक्सप्रेसवर पलटी झालाय. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर गॅस टँकर, टेम्पो, ट्रेलरचा अपघात झाल्याने गॅस टँकर रस्त्यातच पलटी झाला. तर अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला . यावेळी, मागून आलेल्या टेम्पोने गॅस टँकरला धडक दिली. बोरघाटात झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून ही वाहतूक पुण्याकडे येणाऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.

ज्वलनशील गॅस असल्यामुळे सावधानता बाळगून टँकंरपासून सुरक्षित अतंर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, गॅस टँकरमधून प्रोपिलीन गॅसची गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच पोलीस आणि आयआरबी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. तसेच, गॅस टँकरमधील गळती थांबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

Related Stories

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे,संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा

Abhijeet Shinde

राफेल करारावर ‘कॅग’वर्षाव

Patil_p

Sangli; आटपाडीत ज्वेलर्स दुकान फोडून 20 लाखांची चोरी

Abhijeet Khandekar

‘देशात कोरोनाच्या काळात भाजपने हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Abhijeet Shinde

केंद्र सरकारच्या ‘त्या’ दाव्यावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

हनीट्रप करुन लुटणारी टोळी जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!