Tarun Bharat

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात; दोन जण ठार

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. या अपघाताने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरने कारला भीषण धडक दिली. या धडकेनंतरही त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनं येऊन धडकली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. हे दोघे जण कोण होते याची ओळख अद्याप पटली नाही आहे.


दरम्यान, या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

Related Stories

येरवडा मनोरुग्णालयात अनैसर्गिक कृत्याचा प्रकार

datta jadhav

अक्कलकोटमध्ये सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

मुख्यमंत्र्यांकडे 6 बंगले कसे?; सोमय्याजी यावरही बोला…

datta jadhav

कोविड 19 लसीकरण मोहीमेस प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

Tousif Mujawar

आम्हीही याच देशाचे, आमचीही स्वतंत्र जनगणना करा : पंकजा मुंडे

Archana Banage

सर्व वयोगटातील पुणेकरांना कोविड प्रतिबंध लस विनामूल्य उपलब्ध करून द्या

Tousif Mujawar