Tarun Bharat

मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : परमबीर सिंह

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेली तसेच मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. 


ते म्हणाले, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात  आमची चौकशी ही प्रोफेशनल होती. एम्सने देख आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटले नसल्याचे ते म्हणाले.

अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण एम्सच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.

मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र सत्य अखेर समोर आले. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. 

Related Stories

पालिकेच्या लेट लतिफांची धरपकड

Patil_p

पदार्पणात द्विशतक ठोकणारा मुंबईचा सुवेद पारकर ठरला दुसरा भारतीय

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात दिवसभरात 45 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

datta jadhav

चिपळूणमध्ये गारांचा पाऊस

Abhijeet Shinde

पोवई नाका प्रांत कार्यालय परिसर नो पार्किंग झोन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!