Tarun Bharat

मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट

मुंबई / ऑनलाईन टीम

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. मुंबईत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर या दोघांची भेट झाली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांच्या कथित गैरकारभाराविरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर देशमुख-नगराळेंची भेट झाली. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि डीजीपी रजनीश शेठ यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनिट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

हेमंत नगराळे यांनी कालच राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली होती. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.

Related Stories

…तर हे भाजपला नक्की महागात पडेल – संजय राऊत

Abhijeet Khandekar

गोवा विधानसभा निवडणूकीची तयारी सर्व मतदारसंघात सुरू

Abhijeet Khandekar

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर

Archana Banage

अकरावी प्रवेशासाठी 26 पासून नोंदणी

Tousif Mujawar

राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ लागू…!

Rohit Salunke

मूर्तीकार गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त

Archana Banage