Tarun Bharat

मुंबई-बेंगळूर महामार्गावर 100 चार्जिंग स्टेशन्स

केंद्र सरकारची मंजुरी : 25 कि.मी. अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्टेशन्स होणार

प्रतिनिधी /बेळगाव

देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकीकडे इंधन दरवाढ होत असल्यामुळे दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिक वळत आहेत. या वाहनांना तितक्मयाच प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उभारणे गरजेचे आहे. हे ओळखून केंद्र सरकारने मुंबई-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर 100 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱया वाहनांना महामार्गाशेजारीच चार्जिंग करणे सोयीचे होणार आहे.

सध्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. याचबरोबरीने आता इलेक्ट्रिक चारचाकी वाहनेही रस्त्यावरून धावत आहेत. मोठी महानगरे वगळता अद्याप इतर भागात चार्जिंग स्टेशन्स नाहीत. कमी वेळेत वाहनांमध्ये लवकरात लवकर इलेक्ट्रिक चार्जिंग व्हावे, असे तंत्रज्ञान असणारे चार्जिंग स्टेशन्स ठिकठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्राबरोबरच राज्य सरकारकडून चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई-बेंगळूर या 1 हजार कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गावर 100 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुजर यांनी संसदेत दिली. किमान 25 कि. मी. अंतरावर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. मुंबई-बेंगळूर हा महामार्ग बेळगाव जिल्हय़ातून जात असल्यामुळे अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी जागांची पाहणी केली जात आहे.

Related Stories

कोरोना साथीत बिम्सची साथ कुठवर?

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात आज आणखी चार कोरोना बाधित रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

परिवहनसमोर कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न

Amit Kulkarni

कंपन्यांकडून होणारा त्रास थांबवा !

Tousif Mujawar

मंदिरात चोरी ; साडेपाच किलो चांदीचा मुकुट लांबवला

Rohit Salunke

लम्पीनंतर प्रथमच जनावरांचा आठवडी बाजार बहरला

Patil_p