Tarun Bharat

मुंबई महापालिकेत सहाय्यक पदासाठी 874 जागांची भरती

Advertisements

 ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी 874 जागांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून ही भरती प्रकिया राबविण्यात येईल.

मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली होती. त्यानंतर आता कार्यकारी सहाय्यक पदासांठी जागा भरण्यात येणार आहेत. पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण 5255 पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने 3221 पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली 874 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत.

या भरतीसाठी पालिकेने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनि÷ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी 500 रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी 300 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाईनच्या महारिप्रुटमेंट या वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Related Stories

”राज्य सरकारला केवळ पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याच करिअरची चिंता, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच देणघेण नाही”

Archana Banage

मुंबईत मर्सिडीजमधून दारूची तस्करी

prashant_c

पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, म्हणाले…

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 20 हजार पार

Tousif Mujawar

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

Archana Banage

वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू; प्रविण दरेकरांनी साधला राऊतांवर निशाणा

Archana Banage
error: Content is protected !!