Tarun Bharat

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत दोन अंध माणदेशी विद्यार्थी धावणार

Advertisements

प्रतिनिधी/म्हसवड

जन्मजात अंध असलेले इंजबाव ता.माण येथील सचिन बाळु तुपे व विलास महादेव गेंड हे येथील माण देशी फाऊंडेशन संचलित यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीएच्या तृतीय वर्ष वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मुंबई येथे रविवारी ( ता.19) आयोजित केलेल्या टीएम एम 2020 मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार असल्याची माहिती माण देशी फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी दिली.

विशेष बाब म्हणजे या दोन्ही अंध विद्यार्थ्याना या मॅरेथॉन स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सोबत येथील माण देशी फाऊंडेशन व माण देशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा व माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा हे दोघेजण त्यांच्या सोबतीस प्रत्यक्ष भाग घेऊन धावणार आहेत.

सचिन तुपे व विलास गेंड हे म्हसवड येथे मुक्त विद्यापिठातून मध्ये शिक्षण घेत पुणे येथील नवजीवन प्रशिक्षण संस्थेतही कॉम्प्युटरचे शिक्षण घेत आहे.मॅरेथॉन स्पर्धेसाठी या दोन्ही अंध विद्यार्थ्यांना येथील मेगासिटीतील प्रशस्त माण देशी चॅम्पियन्स क्रिडांगणात क्रिडा प्रशिक्षक श्री.लोखंडे दररोज धावण्या सराव प्रशिक्षण देत आहेत.

Related Stories

राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रांवर बंदी

Patil_p

मधुमिताच्या ‘राईसप्लेट’ला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार

Patil_p

सातारा : ब्रिटीशकालीन रस्ता घेणार मोकळा श्वास

Archana Banage

महाबळेश्वर तालुक्यात वीज कोसळली, दोन गंभीर जखमी

Archana Banage

सातारा : मेढा येथे उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट

datta jadhav

शिक्षक बँकेची निवडणूक शिक्षक समिती स्वबळावर लढविणार – उदय शिंदे

Archana Banage
error: Content is protected !!