Tarun Bharat

मुंबई विद्यापीठांतर्गत सामाजिक क्षेत्रातील योगदाना बाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Advertisements

सावंतवाडी /वार्ताहर-

मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचा विस्तार कार्य आता घरोघरी पोहोचण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठांतर्गत जवळपास 800 महाविद्यालय आहेत. त्यापैकी ३०५ महाविद्यालयात आतापर्यंत विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पोहोचले आहे. अजून निम्म्याहून अधिक महाविद्यालयया प्रक्रियेत यायचे आहेत. कोकण विभागातील ठाणे, पनवेल  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महाविद्यालय विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने प्रक्रियेत आली आहेत अशी माहिती मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर कृणाल जाधव यांनी दिली.


                सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे नियोजन नीटनेटके आणि उत्कृष्ट असे आहेअशा शब्दातही गौरवोद्गार काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 37 महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत सावंतवाडीतील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेज येथे विस्तार कार्य वाढवण्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील योगदान बाबतप्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.


                 यावेळी संचालक कुणाल जाधव, प्राचार्य यशोधन गवस, बाजूला लोकमान्य ट्रस्टचे एक्झिक्युटीव्ह महेश सातवस, कुमार सावंत, सचिन मांजरेकर, उमेश परब, श्री ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

असलदेत काजू बागायतीला आग

NIKHIL_N

जिल्हय़ातील 103 संशयितांचे अहवाल अद्यापही प्रतीक्षेत

Patil_p

घाणेखुंट ग्रामपंचायत परिसर दीडशेहून अधिक एलईडी पथदीपांनी उजळला!

Patil_p

कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे चिरे घरावर आदळले

Patil_p

पालकमंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

NIKHIL_N
error: Content is protected !!