Tarun Bharat

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया आजपासून

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

 • 5 ऑगस्ट 2021 पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन

नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू करण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करावे click on-Mumbai University Pre Admission online Registration 2021-22) विद्यार्थ्याने स्वत:बद्दलची माहिती भरून नोंदणी करायची आहे. त्यानंतर मोबाइल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर आवश्यक माहिती भरून विद्यार्थ्यांनी छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. त्यानंतर शिक्षणक्रम आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना निवडता येतील.

 • ऑनलाईन अर्ज विक्री – 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (1 वाजेपर्यंत)
 • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 ( 1 वाजेपर्यंत)
 • ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख – 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक)
 • इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
 • पहिली मेरीट लिस्ट – 17 ऑगस्ट, 2021 ( सकाळी 11 वाजता)
 • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021 (सायं. 3 वाजे पर्यंत )
 • द्वितीय मेरीट लिस्ट – 25 ऑगस्ट, 2021 ( सायं. 7 वा.)
 • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 ( सायं. 3 वाजे पर्यंत)
 • तृतीय मेरीट लिस्ट – 30 ऑगस्ट, 2021 ( सायं. 7 वा.)
 • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, 2021

Related Stories

लाकडाची अवैध वाहतूक करणाऱया दोघांना अटक

Patil_p

स्वाभिमानीकडून विधान परिषदेसाठी राजू शेट्टींच्या नावावर शिक्कामोर्तब

Archana Banage

‘कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करा’

Tousif Mujawar

साताऱयात अन्यायकारक घरपट्टी वाढ होऊ देणार नाही

Patil_p

त्यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, गावात फटाक्याची आतषबाजी

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Tousif Mujawar