Tarun Bharat

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश – सचिन सावंत

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

मुंबई विमानतळाचे मुख्यालय आता मुंबईतून अहमदाबाद येथे हलवण्यात आलं आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे पाहिले तर निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील जनतेला संदेश आहे, असे ट्वीट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे.

सचिन सावंत यांनी मुंबई विमानतळाच्या मुद्दयावरून ट्वीट करत म्हटले आहे की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही, असे सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्याप्रमाणेच मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील याच मुद्दयावरून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, , फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे, विमानतळ मुंबईमध्येच आहे, असं म्हणत एकप्रकारे इशारा दिला आहे. “फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय …विमानतळ मुंबईमध्येच आहे…आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.

Related Stories

पन्हाळा कोंविड सेंटरला पुणे उपायुक्तांची भेट

Abhijeet Shinde

गुड न्यूज : लसीच्या चाचणीसाठी पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला डीसीजीआयची परवानगी

Rohan_P

गोवा निवडणूक : भाजप सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार

Sumit Tambekar

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p

लॉक डाऊनच्या काळात धोनी, अश्विनकडून ऑनलाईन प्रशिक्षण

prashant_c

उत्तराखंडातील लॉकडाऊनमध्ये वाढ; 1 जूनपर्यंत निर्बंध कायम

Rohan_P
error: Content is protected !!