Tarun Bharat

मुंबई सेंट्रल येथील 62 झोपडय़ा जमीनदोस्त

Advertisements

मुंबई / प्रतिनिधी

 महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने, मुंबई सेंट्रल, मराठा मंदिर मार्ग येथील 62 झोपडय़ांवर गुरुवारी कारवाई करून त्या जमिनदोस्त केल्या. परिमंडळ 1 चे उपायुक्त हर्षद काळे व ‘ई’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पालिकेने महात्मा गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत या झोपडय़ांवर कारवाई केली. त्यामुळे भायखळा येथील रिझर्व्ह बँक स्टाफ क्वॉटर्समधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला.

  मात्र, येथील पात्र झोपडीधारकांना चेंबूर येथील मुकुंदनगर, मैसूर कॉलनी येथे पर्यायी घरे देण्यात आली आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने 135 कामगार, 2 जेसीबी, 8 डंपर यांचा वापर करून सदर कारवाई केली. त्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचीही मदत घेण्यात आली.

Related Stories

वाचा सविस्तर, सीबीआयने २ दिवस अगोदरच ठोकला तळ

Abhijeet Shinde

ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

Rohan_P

”ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

Abhijeet Shinde

यंदा कमी होणार 16 लाख रोजगार

prashant_c

शेतकऱयांसाठी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रकल्प

amol_m

उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!

Rohan_P
error: Content is protected !!