Tarun Bharat

मुंबै बॅंकप्रकरणी दरेकरांची चौकशी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबै बॅंक (mumbai bank) घोटाळाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी मुंबई पोलिसांनी (mumbai police) नोटीस बजावली होती. आज दरेकर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झालेत. दरम्यान, पोलीस स्थानकाच्या परिसरात भाजप (bjp) कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

दरम्यान, प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात (ramabai ambedkar marg police station) दाखल झालेत. दरेकर मुंबई बँकत मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना आज चौकशीला हजर राहण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरेकरांना आज चौकशीला बोलावलं आहे. दरम्यान चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे तर अनिल परबांना स्वत:हून अटक करा; चंद्रकांतदादांचा पलटवार

Archana Banage

राज्यात 24 तासांत 30 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

Archana Banage

भारत बायोटेकला धक्का ! WHO ने लसीचा आंतरराष्ट्रीय पुरवठा थांबवला

Archana Banage

भारतीय वंशाच्या CEO चा एक कॉल आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार

Archana Banage

सांताक्रूझमधील LIC कार्यालयाला भीषण आग

datta jadhav

मविआच्या भेटीनंतरही भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम ?

Archana Banage