Tarun Bharat

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली/प्रतिनिधी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियर्नस इंडेक्स ने हि माहिती दिली आहे. चीनच्या झोँग शनशानने या आठवड्यात २२ अब्ज डॉलर्स गमावल्यामुळे हा बदल झाला. झोंगच्या कंपनीला या आठवड्यात विक्रमी २० टक्के तोटा सहन करावा लागला.

मुकेश अंबानी यांची संपत्ती सुमारे ८० अब्ज डॉलर्सची असून झोँगची संपत्ती ७६.६ अब्ज डॉलर्स आहे. झोंग शनशान यापूर्वी जॅक मासारख्या चिनी टेक दिग्गजाला मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला होता.

गेल्या दोन वर्षांपासून मुकेश अंबानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत लोकांच्या क्रमवारीत आघाडीवर आहेत. परंतु झोँग शशानने आपल्या दोन कंपन्यांमुळे कमावलेल्या फायद्याच्या जोरावर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविलं;आ होता. २०२१ च्या सुरुवातीस झोँग शनशान जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी आणि गूगल फेसबुकसह इतर गुंतवणूकदारांना रिलायंस डिजिटल आणि रिटेल युनिटमधील भागांची विक्री करून आपले भविष्य उंचावले आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

Related Stories

कोल्हापुरच्या लाल मातीत घुमणार राष्ट्रीय कुस्तीचा शड्डू

Archana Banage

उष्मालाटेविरोधात उपाययोजना

Patil_p

जनमत चाचणीत बिडेन आघाडीवर

datta jadhav

बिहार : राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध

datta jadhav

जगाला दिशा देण्यासाठी भारताला सशक्त, आत्मनिर्भर होण्याची गरज

datta jadhav

‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले”

Archana Banage