Tarun Bharat

मुक्या प्राण्यांची सर्वात चांगली मैत्रिण

तेलंगणातील मेहबूबाबादच्या मोहम्मद सुमाचे कौतुकास्पद कार्य, आतापर्यंत 120 हून प्राणी अन् पक्ष्यांचा वाचविला आहे जीव

मोहम्मद सुमा (21 वर्षे) ही युवती तेलंगणाच्या मेहबूबाबादमध्ये राहते आणि मागील 10 वर्षांपासून संकटात सापडलेल्या प्राण्यांची मदत करणे हेच तिचे ध्येय राहिले आहे. शनिवारी तिने 40 फूट खोली विहिरीत पडलेल्या कोल्हय़ाच्या पिल्ल्याला सुरक्षित बाहेर काढले आहे.

सूमाने आतापर्यंत 120 हून अधिक प्राणी आणि पक्ष्यांचा जीव वाचविला आहे. यात गाय, श्वान, मांजर आणि पक्ष्यांसह बिबटय़ा तसेच अजगर देखील सामील आहे. सूमाने हे काम वयाच्या 11 व्या वर्षी सुरू केले होते. तिने स्वतःच्या घरात आजारी प्राण्यांना ठेवण्यासाठी एक शेडही तयार केला आहे.

घडय़ाळात कितीही वाजले असले तरीही ती प्राण्यांना वाचविण्याकरता पूर्णपणे झोकून देते. या कामाची प्रेरणा मला पालकांकडून मिळाली आहे. माझे आईवडिल पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहेत असे सूमा सांगते.

रात्री एखाद्या प्राण्याला वाचविण्यासाठी फोन आल्यास माझे वडिल या कामासाठी माझ्यासोबत येतात असे तिने म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी सूमाने वन्यप्राणी पकडून तो वन विभागाच्या स्वाधीन केला होता. तिच्या घरातील प्राण्यांची संख्या आता वाढू लागली आहे.

Related Stories

युद्धादरम्यान युक्रेनमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल

Patil_p

मध्यप्रदेश सरकार ‘शेण’ खरेदी करणार

Patil_p

हरियाणा शीख गुरुद्वारा अधिनियमाची वैधता कायम

Patil_p

भारतात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वातावरण

Patil_p

‘झायडस’च्या माध्यमातून देशात येणार चौथी लस

Patil_p

दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याचा निर्धार

Patil_p
error: Content is protected !!