Tarun Bharat

मुख्तारच्या पुत्रावर आयोगाची बंदी

Advertisements

अब्बास अंसारीवर प्रचारबंदी : मऊ शहर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार

पूर्वांचलचा माफिका मुख्तार अंसारीचा पुत्र अब्बासवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. अब्बासला 24 तासांपर्यंत कुठल्याही प्रकारे प्रचार करता येणार नाही. निवडणूक आयोगाने त्याच्या व्हायरल व्हिडिओच्या आधारावर नोंद एफआयआरनंतर हे पाऊल उचलले आहे.

बांदा तुरुंगात कैद मुख्तार अंसारीच्या पुत्राला मऊ मतदारसंघातून ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने मैदानात उतरविले आहे. मऊमध्ये 7 व्या टप्प्याच्या अंतर्गत 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 7 व्या टप्प्यासाठी शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा होती. परंतु अब्बास यांना आता शनिवारी प्रचार करता आलेला नाही. अब्बासचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, याप्रकरणी त्याच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या गुन्हा नोंद झाला आहे. तुरुंगात कैद माफिया मुख्तार अंसारीच्या पुत्राने सत्तेवर आल्यास अधिकाऱयांचा हिशेब करणार असल्याची धमकी दिली आहे.

मऊ शहर मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. माफिका मुख्तारचा पुत्र या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. अब्बास याने अखिलेश यादव यांचे नाव घेत सरकार स्थापन झाल्यास बदलीपूर्वी अधिकाऱयांचा हिशेब मांडणार असल्याचे म्हटले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांच्याकडून अब्बासवर कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. अब्बास विरोधात मऊ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

अब्बासने गुरुवारी रात्री पहाडपुराच्या मैदानात प्रचारसभा घेतली होती. ‘ज्या नेत्यासोबत लाखो-कोटय़वधींचे बाहुंचे बळ असेल, तर तो बाहुबली नसेल तर कोण असेल. लखनौत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना भेटून आलो आहे. 6 महिन्यांपर्यंत कुणाचीच बदली करू नका असे सांगून आलो आहे. जो इथे तैनात आहे, तो इथेच राहणार, अधिकाऱयाने कुणासोबत काय केले, याचा हिशेब त्याला द्यावा लागणार आहे. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यावर अधिकाऱयांना योग्यप्रकारे हाताळू असे अब्बास यांनी म्हटले होते.

Related Stories

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह पुन्हा झाले‌ क्वारंटाइन

Rohan_P

नवा अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधीच नेत्या

Patil_p

27 जुलैपासून नियमित सुनावणी

Patil_p

शंकरसिंह वाघेला यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Rohan_P

आणखीन किती यश हवे?

Patil_p

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी : केंद्र आणि पंजाब सरकारला तपास थांबविण्याचे आदेश

datta jadhav
error: Content is protected !!