मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील कंपोझिट इनडोअर फायरिंग रेंज, अॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान, सिंथेटिक टॉप व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान व निसर्ग उद्यान प्रकल्प यांचे उद्घाटन सोमवारी (दि.9) दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शंभूराज देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कडोकट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


next post