Tarun Bharat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज; आदित्य ठाकरेंसोबत ‘वर्षा’वर दाखल

प्रतिनिधी/मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज, गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्री मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात १० नोव्हेंबरला दाखल झाले होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता २१ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.

Related Stories

सातारा जिल्ह्यासाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

Archana Banage

किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापुरात

Archana Banage

व्यापाऱयांचा विरोध पण लॉकडाऊन सुरुच

Patil_p

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आदित्य ठाकरेंची साथ

Archana Banage

सातारा शहरासह जिह्यात छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी

Patil_p

कोरोना संकटामुळे यावर्षीचा विजय दिवस समारोह रद्द

Patil_p