Tarun Bharat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शोक व्यक्त

प्रतिनिधी/मुंबई

कोल्हापूर (उत्तर) मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली…”

Related Stories

कोल्हापूर : मतदान केंद्र निहाय लसीकरणास परवानगी द्या

Archana Banage

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ

Abhijeet Khandekar

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट

Archana Banage

‘जलनायक’ या माहितीपटाचं लवकरच लोकार्पण

Rohit Salunke

भ्रष्टाचारप्रकरणी मलेशियाच्या माजी पंतप्रधानांना 12 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 920 मृत्यू ; 57,640 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar