Tarun Bharat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा दौर्‍यावर; दूर्घटनाग्रस्त रुग्णालयाची करणार पाहणी

Advertisements

ऑनलाईन टीम

काल, शनिवारी (दि.9) भंडारा जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्देवी दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. हे सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.

दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.

हा दुर्देवी घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Related Stories

समित ठक्करला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Rohan_P

मलिकांच्या जामीन अर्जावर १९ जुलै रोजी सुनावणी

Abhijeet Shinde

बस-कंटेनरच्या भीषण अपघातात 7 ठार, 13 जखमी

datta jadhav

भारताचा विकासदर येणार 2.8 टक्क्यांवर

prashant_c

लॉकडाऊनमध्ये कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटात

prashant_c

सोलापुरात नव्याने आढळले 6 कोरोनाबाधीत रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!