Tarun Bharat

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

Advertisements

राज्याला संबोधित करताना दिला लॉकडाऊनचा इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी देशभर ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पाडला. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यानिमित्त वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहन केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन ही त्यांनी यावेळी केले. आणि कोरोना संसर्गा पासून वाचण्यासाठी नियमांच पालन करुयात अन्यथा रुग्ण वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज्यात १६ ऑगस्ट पासून कोरोना निर्बंध शिथील केले जाणार असल्याने कोरोना नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा राज्यातील कोरोना स्थिती पुन्हा बिघडू शकते. तशी स्थिती निर्माण झाल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागेल असा इशारा ही या वेळी दिला.

कोरोना संकट अद्याप पुर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे काही राष्ट्रात कोरोना पुन्हा फैलावत आहे. त्यामुळे नियमावली पाळत काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना काळात आरोग्यसुविधा वाढवल्या तरी ऑक्सिजन साठ्याचा प्रश्न हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी कृपा करुन दिल्या जाणाऱ्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावेत असे म्हटले आहे.

Related Stories

२९ जून सांख्यिकी दिवस म्हणून साजरा

Nilkanth Sonar

मराठा आरक्षण रद्द; कोरोना संकटात मराठा समाजाने संयम बाळगावा : संभाजीराजे

Abhijeet Shinde

कोरोनामुळे यंदा IITs, IIITs कडून फी वाढ नाही

prashant_c

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Rohan_P

जिल्हा ग्रामीण भागात 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

बॅटरी, दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!