Tarun Bharat

मुख्यमंत्री कोण असावेत हे पक्षाचे आमदार आणि हाय कमांड ठरवतील: राहुल गांधी

बेंगळूर/प्रतिनिधी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मतभेद बाजूला सारून एकत्र काम करण्यास सांगितले. दरम्यान, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधींनी घेतलेल्या बैठकीला सिद्धरामय्या आणि शिवकुमार दोघांनीही उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी यांनी दोघांनाही पुढील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असावे याची पर्वा न करता त्यांनी पक्षासाठी काम करावे. गांधी यांनी त्यांना सांगितले की, पुढचे मुख्यमंत्री कोण असावेत हे पक्षाचे आमदार आणि हाय कमांड निर्णय घेतील, असे कॉंग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

राज्यातील अंतर्गत भांडणे सोडविण्यासाठी राहुल गांधींनी हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, सिद्धरामय्या यांना पुढील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याची मागणी पक्षातील एका गटाने निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात राज्यातील पुढील मुख्यमंत्री कोण यावरून अंतर्गत वाद सुरु आहे. पण दोन्ही नेत्यांनी आमच्यात कोणताही वाद नसल्याचे याआधी म्हंटले आहे.

Related Stories

दिलासादायक: कर्नाटकात कोरोना सकारात्मकता दर २.५९ टक्क्यावर

Archana Banage

कर्नाटक कोरोना : युरोपहून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन नियमावली जाहीर

Archana Banage

राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर

Tousif Mujawar

कस्तुरी रंगराजन अहवालाची अंमलबजावणी नको

Tousif Mujawar

मधमाश्यांची खोकी असणारे कुंपण रोखणार हत्ती-मानव संघर्ष

Amit Kulkarni

दहावी परीक्षेचा निकाल 99.9 टक्के

Patil_p