Tarun Bharat

मुख्यमंत्री तीन दिवस उत्तरप्रदेशच्या दौऱयावर

Advertisements

सोमवारचे कामकाज संपवून होणार रवाना

प्रतिनिधी/ बेळगाव

सोमवार दि. 13 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. याचकाळात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे सोमवारपासून तीन दिवस उत्तरप्रदेशच्या दौऱयावर जाणार आहेत. ऐन अधिवेशनाच्या काळात त्यांचा हा दौरा ठरला आहे.

शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. रविवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ते विमानाने हुबळीला येणार आहेत. दुपारी 2.15 वाजता कारने सांबरा विमानतळावर पोहोचणार असून 3.15 वाजता विमानाने ते बेंगळूरला जाणार आहेत.

सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता विमानाने मुख्यमंत्र्यांचे सांबरा विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजता ते विधानसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. या यादीत पुढील कार्यक्रमाची माहिती नसली तरी सोमवारी दुपारीच विशेष विमानाने मुख्यमंत्री सहकुटुंब वाराणसीला जाणार आहेत.

भाजपची राजवट असणाऱया राज्यातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसाठी तीन दिवसांची धार्मिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी सोमवारी दुपारीच मुख्यमंत्री वाराणसीला जाणार आहेत. सायंकाळी ते गंगा आरतीत भाग घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी सारनाथ येथील बौद्ध धर्मियांच्या पवित्र ठिकाणाला भेट देणार आहेत. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती केंद्राला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. बुधवारी अयोध्येला जाणार असून राम जन्मभूमीला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री बेळगावला येणार आहेत. ऐन अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री तीन दिवस उत्तरप्रदेशच्या दौऱयावर जाणार आहेत. हा विषय आता चर्चेचा ठरला आहे.

Related Stories

पॅसेंजर रेल्वे रुळावर केव्हा?

Patil_p

येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मजहर खानापुरी

Rohan_P

स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे मृतदेह स्मशानात नेण्यास अडचण

Amit Kulkarni

माजी नगरसेवक घेणार नगरविकासमंत्र्यांची भेट

Patil_p

मदतीसाठी सरसावला माजी विद्यार्थी संघ

Amit Kulkarni
error: Content is protected !!