Tarun Bharat

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मानले लोकमान्य सोसायटीचे आभार

Advertisements

 प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यतानिधीला 11 लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लोकमान्य सोसायटी आणि परिवाराचे आभार मानले आहेत.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी किरण ठाकुर यांना कृतज्ञतेचे पत्र पाठविले असून त्यामध्ये म्हंटले आहे की, कोरोना थोपविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करावे लागले. नियम पाळून काळजी घेण्यात आली. परंतु शेतकरी, कामगार, मजूर, लघुउद्योजक, फेरी वाले, विपेते, रिक्षा चालक यांच्यासह अनेक घटक अडचणीत आले. या सर्वांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि कोरोनाची लागण झालेल्यांना उत्तम दर्जाचे उपचार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

हे कर्तव्य पार पाडताना तुम्ही सरकारला हातभार लावून मानवी औदार्य दाखविले आहे. 31 मार्च रोजी आपण जो निधी पाठविला आहे त्याचा आपण कृतज्ञतेने स्वीकार करत आहोत. या मदतीचा कोरोना थोपविण्यासाठी सरकारला उपयोग होणार आहे. त्यामुळे सरकार कृतज्ञ आहे. आपले सहकार्य असेच राहो असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी नमूद केले आहे.

Related Stories

गटारीमधील अनेक वाहिन्यांमुळे साचले सांडपाणी

Amit Kulkarni

मनपाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू

Patil_p

कलाश्री सातव्या बक्षिसाचे लक्ष्मण खेमनाळकर मानकरी

Amit Kulkarni

आरसीयूच्या कारभाराची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

Amit Kulkarni

येळ्ळूर ग्रा.पं.वर म. ए. समितीचे वर्चस्व

Omkar B

कट्टणभावीत गवीरेडय़ाचा धुमाकूळ

Omkar B
error: Content is protected !!