बेंगळूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजकीय नेत्यांनाही संसर्ग होत आहे. सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असून होम क्वारंटाईन झालो आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी सकाळी कोविड बूस्टर डोस लसीकरणाला चालना दिली. त्यानंतर साहित्यिक डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले तर सायंकाळी अंत्यविधीमध्ये देखील सहभागी झाले होते. दुपारी प्रशासकीय सुधारणेसंबंधी आयोजिलेल्या बैठकीतही ते सहभागी झाले होते.


previous post
next post