Tarun Bharat

मुख्यमंत्री येडियुरप्पा आज दिल्ली दौऱ्यावर; पक्षश्रेष्ठींना भेटणार

Advertisements

बेंगळूर /प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा शुक्रवारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संभाव्य बैठक होणार आहे.

दरम्यान, कर्नाटकातील भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलह वारंवार समोर येत आहे. राज्यात नेतृत्व बदलावरून धुसफूस सुरु आहे. याआधीही या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांनी नेतृत्व बदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यानंतरही पुन्हा नेतृत्वदलाचा मुद्दा पुढे येत आहे. याच प्रश्नावरुन मुख्यमंत्री येडियुरप्पा हे दिल्ली दौरा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच महत्वाचं म्हणजे ३४ सदस्यांच्या मंत्रिमंडळात सध्या एक जागा रिक्त आहे, पण असे म्हटले जाते की येडियुरप्पा मोदींप्रमाणे मंत्रिमंडळातील जुने चेहरे हटवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहेत. कारण असे केल्याने येडियुरप्पा काही असंतुष्ट घटकांवर नियंत्रण ठेवू पाहतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येडियुरप्पा शनिवारी नवी दिल्ली येथे राहण्याची शक्यता आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक घेऊन मेकेदातू आणि अप्पर भद्रा प्रकल्पांवर चर्चा करू शकतात.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर येडियुरप्पा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांनतर रविवारी ते बेंगळूरला परत येतील अशी माहिती आहे.

Related Stories

कठोर नियम बदलण्याचा प्रश्नच नाही!

Patil_p

विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱयांचा मृत्यू

Rohan_P

न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा

Omkar B

बंदी असणाऱया फटाक्यांची विक्री विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

Patil_p

बेंगळूर: बीबीएमपी झाडे मोजण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घेणार

Abhijeet Shinde

पोटनिवडणूक घोषणा झाल्यास अधिवेशन अर्ध्यावर गुंडाळणार?

Amit Kulkarni
error: Content is protected !!