Tarun Bharat

मुख्यमंत्री येडियुरप्पा निपाणी तालुक्यातील पूरस्थितीची करणार पाहणी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात गेल्याकाही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज निपाणी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत. विशेष करून कोडणी व महामार्गावर सौंदलगा या टापूत आलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.

दरम्यान, निपाणी तालुक्यातील वेदगंगा, दूधगंगा नदी काठावरील सुमारे २५ गावांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये ४ हजार नागरिकांचे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये दुधगंगा नदी काठावरील कुन्नूर गावाला तिन्ही बाजूंनी महापुराने वेढा दिल्याने या गावचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने सध्या निपाणी पोलिस प्रशासनाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सद्या ‘एनडीआरएफ’ पथकाच्यावतीने अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची यांत्रिक बोटीदारे होणारी वाहतूक थांबली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे सौंदलगा ते निपाणी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसह रुग्णांची वाहतूक सुरू आहे.

Related Stories

“भाजप म्हणजे फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”, बंगालच्या भाजप कार्यकर्त्यांनी मागितली माफी

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमध्येच जनतेला ‘शॉक’

Amit Kulkarni

दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,29,531वर 

Rohan_P

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या जीपला भीषण अपघात

Sumit Tambekar

आपल्या कलाकृतीतून ‘कोरोनाला फटकावण्याचा संदेश’ देत सचिनच्या चाहत्याने दिल्या सचिनला शुभेच्छा!

prashant_c

मदरशांमध्ये आता रामायण अन् भगवद्गीतेचे शिक्षण

Patil_p
error: Content is protected !!