Tarun Bharat

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते व्हेंटिलेटर युनिटचे उद्घाटन

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या पुणयतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि सिव्हील हॉस्पिटलचा दौरा केला. 


यावेळी योगी यांनी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच यावेळी रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या युनिटचे योगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या युनिटमध्ये 12 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यातील 8 लहान मुलांसाठी तर 4 वृध्द व्यक्तीसाठी आहेत. 


यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबीयांसोबत देखील संवाद साधला. तसेच रुग्णांना लवकरात लवकर बरे वाटवे यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. 

Related Stories

कोरोनावरील ‘मोलनुपिरावीर’ गोळी होणार लाँच

datta jadhav

सचिन वाझेंना जामीन मंजूर, पण सुटका नाहीच

Archana Banage

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

दोन्ही मतदार संघात भाजपचा पराभव होणारचं, संजय राऊत

Archana Banage

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी काम सुरू

Patil_p

महाराष्ट्र, केरळमधून येणाऱयांना कोरोना चाचणी बंधनकारक

Patil_p