Tarun Bharat

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवण्याची धमकी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन या ट्विटर हँडलवरुन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धमकीनंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गोरखनाथ मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप नेत्यांना धमकी मिळाली आहे. धमकीच्या वृत्तानंतर उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मेरठमध्येही बॉम्बस्फोट करण्याबाबतचे संभाषण या ट्विटरवरुन करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी गोरखनाथ मंदिरात तपास सुरु केला असून पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी मिळाल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

Related Stories

इंडिया गेट, लाल किल्ला, उच्च न्यायालयाची रेकी

Patil_p

“गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

Archana Banage

व्हिएतनामकडून प्रथमच भारतीय तांदळाची खरेदी

Patil_p

सुरक्षा दलावर हल्ला, दहशतवाद्याचा खात्मा

Patil_p

Sangli; बलवडी(भा) येथे सख्ख्या भावाचा डोक्यात मशीन घालून खून

Abhijeet Khandekar

सेनेतील १५ आमदारांना उध्दव ठाकरेंचे भावनिक पत्र; म्हणाले,शिवसेनेला बळ दिलेत…

Abhijeet Khandekar