Tarun Bharat

मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

गोवा राज्य क्रांतीदिनाचा योग साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजना 2021’ चा शुभारंभ केला. त्यावेळी गोवा सरकार आणि 15 कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यात करार होऊन त्यावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती उपस्थित होते.

सरकारचे सदर महामंडळ आणि विविध कंपन्या, उद्योगांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात हा करार झाला आणि त्यांनी त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण केली. वेदांता लिमिडेट, शिप्ला लिमिटेड, नेस्ले इंडिया लि. लुपिन लि, मायक्रोलॅब लि, फिनोलेक्स लि. अशा एकूण 15 नामवंत कंपन्यांनी सदर योजनेसाठी करार केला असून त्या कंपन्या आता कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी नोंदणी केलेल्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

दर्जात्मक मनुष्यबळ, रोजगार तयार करून गोमंतकीय तरूण पिढीला नोकऱयांची संधी या योजनेतून मिळणार असल्याची माहिती नावती यांनी दिली. त्यानंतर बोलताना डॉ. सावंत यांनी सदर योजनेचे उद्घाटन व शुभारंभ होत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की या योजनेत गोव्यातील नामांकित अशा 30 कंपन्यांनी सहभाग दाखवला आहे. अनेक कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही तेव्हा त्यांना बाहेरून कामगार आणावे लागतात. तेच येथे तयार व्हावेत आणि गरजेनुसार  कंपन्यांना मिळावेत म्हणून सदर योजना आहे. केंद्रीय रोजगार प्रशिक्षण योजनेचा धर्तीवर ती योजना आखण्यात आली असून पहिल्या 2500 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी रु. 1500 प्रति महिना विद्यावेतन मिळणार असून किमान 5 वर्षे तरी ती योजना राबवण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात, गोमंतकीयांना नोकऱया मिळतील असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

Related Stories

‘कालचा दिवस बरा होता’ म्हणण्याची वेळ

Amit Kulkarni

केजरीवाल मॉडेल हेच गोव्याला पुढे नेणार

Amit Kulkarni

वास्कोत शांततापूर्ण तणाव : कडक बंदोबस्त

Amit Kulkarni

विर्नोडा पेडणे येथे ट्रकसह खैरीचे ओंडके जप्त

Amit Kulkarni

75 कोटी सूर्यनमस्काराचा विक्रम करण्याचे धेय्य

Amit Kulkarni

विर्डी साखळीतील चार दिवशीय कळसोत्सवाला सोमवारी प्रारंभ.

Patil_p
error: Content is protected !!