Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांकडून मेदार समाजालाही पॅकेज जाहीर

@ प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यासह बेळगावात मोठय़ा प्रमाणात मेदार (बुरुड) समाज राहत आहे. तो पारंपरिक व्यवसाय आजपर्यंत जपत आला आहे. मात्र, कोरोनामुळे आम्ही अडचणीत आलो असून तातडीने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी घेतली असून या समाजालाही पॅकेज जाहीर केले आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. खासदार सुरेश अंगडी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मेदार समाज हा अत्यंत मागासलेला आहे. यातच कोरोनासारख्या विषाणूमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. मुळातच गरीब असलेल्या या समाजावर उपासमारीची वेळ आली असून आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे. सध्या ही मदत केली असली तरी अजूनही आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी खासदार अंगडी यांच्याकडे केली आहे.

अखिल कर्नाटक मेदार सेवा संघ आणि श्री केतय्या मेदार समाज शहापूर यांनी हे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी अध्यक्ष वाय. के. हाळपेट्टी, उपाध्यक्ष नागेश कडोली, सेपेटरी पी. मंजुनाथ, अप्पय्या बुरुड, प्रकाश साळुंखे, अर्जुन कडोली, राजू होनगेकर, प्रकाश कडोली, फकिराप्पा मुरगोड उपस्थित होते. 

Related Stories

कर्नाटक: मंत्री एस.टी. सोमशेकर कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सद्गुरुंच्या कृपेनेच मनुष्य देहाचा उद्धार

Patil_p

बेळगाव शहरात 23 केंद्रांवर होणार उद्या टीईटी

Patil_p

यावषीही विद्यार्थ्यांसमोर पाठय़पुस्तकांची समस्या

Amit Kulkarni

किल्ला तलाव कधी स्मार्ट होणार?

Amit Kulkarni

निपाणीतून महाराष्ट्र बससेवा थांबविली

Patil_p