Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे धर्मेश सगलानी

काँग्रेसचे आणखी 9 उमेदवार जाहीर : लोबो कळंगुटमधून, डिलायला निश्चित नाही.सुदिन ढवळीकर विरोधात लवू मामलेदार

प्रतिनिधी /पणजी

काँग्रेस पक्षाने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून सांखळी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात सांखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना उमेदवारी दिल्यामुळे तेथे आता अटीतटीची लढत रंगणार आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी काल मंगळवारी  ही यादी अधिकृतपणे घोषित केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात धर्मेश सगलानी

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? यांची उत्सुकता तेथील आणि गोमंतकीय जनतेला होती. सांखळीत आता सावंत आणि सगलानी हे एकमेकांना भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण गोव्यासाठी ही लढत महत्वपूर्ण ठरणार आहे.

लोबो कळंगुटमधून, डिलायला निश्चित नाही

भाजपमधून अलिकडेच राजीनामा दिलेले मंत्री मायकल लोबो यांना कळंगुट मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु त्यांची पत्नी डिलायला लोबो यांचे नाव मात्र यादीत समाविष्ट नाही. त्यांनी शिवोली मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला असून अजूनपर्यंत त्यांना उमेदवारी निश्चित झालेली नाही.

सांगेतून प्रसाद गावकर रिगंणात

सांगे मतदारसंगाचे माजी अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राजीनामा देऊन प्रथम तृणमूल काँग्रेसची वाट धरली होती. परंतु नंतर त्यांनी वाट बदलून ते काँग्रेसवासी झाले. त्यांनाही सांगेतून काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे.

सुदिन ढवळीकर विरोधात लवू मामलेदार 

माजी आमदार लवू मामलेदार हे मगो पक्ष सोडून प्रथम तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही म्हणून नंतर त्यांनी तेथून राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाची कास धरली. त्यांना मडकई मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

त्याशिवाय डिचोली- मेघःश्याम राऊत, थिवी- अमन लोटलीकर, पर्वरी- विकास प्रभुदेसाई, सांत-आंद्रे- अँथनी फर्नांडिस, काणकोण- जनार्दन भंडारी असे उमेदवार काँग्रेसने या यादीतून जाहीर केले आहेत. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही नावे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार या नात्याने निवडण्यात आली असल्याचे वासनिक यांनी नमूद केले आहे

Related Stories

फोंडय़ात ऐन थंडीत, पावसाच्या सरी

Amit Kulkarni

फोंडा उपनगराध्यक्षांवरील अविश्वासाचा निकाल लटकला

Amit Kulkarni

माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची प्रकृती बिघडली

Patil_p

म्हापसा सेंट झेवियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने

Patil_p

मुरगावच्या पालिका इमारत प्रकरणात सहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा आरोप

Amit Kulkarni

तृतीयपंथीयांना पहिल्यांदाच गोव्यात मतदानाचा अधिकार

Amit Kulkarni