Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी- रोहन खंवटे

प्रतिनिधी /म्हापसा

माजी राज्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्री ड़ॉ. प्रमोद सावंत यांच्यावर केल्यावंर आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकारांशी बोलताना खंवटे म्हणाले की, राज्यपाल असताना मलिक यांच्याशी झालेल्या संवादात सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भ्रष्टाचार केल्याची कबुली दिली होती. राज्यपालांनी असे भ्रष्ट सरकार कधीही पाहिले नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, मुलाखतीद्वारे मलिक यांनी पुन्हा एकदा पुष्टी केली आहे की हे सरकार भ्रष्ट व्यवहारात किती खोलवर गुंतले आहे. या सरकारला चालू ठेवण्याचा अधिकार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे अपक्ष आमदार म्हणाले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मुख्यमंत्र्यांवर आरोप लावणाऱया विरोधकांनी नाही तर मलिक हे एक ज्येष्ठ नेते आहेत ज्यांचा ‘आरएसएस’शी संबंध आहे. त्यांनी हा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कृपापूर्वक राजीनामा द्यावा अन्यथा भाजपने भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर मंत्र्यांसह त्यांची हकालपट्टी करावी असे खंवटे म्हणाले. हा मुद्दा भ्रष्टाचाऱयांबाबत असल्याने अधिक गंभीर असल्याचे आमदार म्हणाले.

Related Stories

हिंदू तेली समाजाचा वार्षिक कार्यक्रम

Amit Kulkarni

झुआरीनगरात कुंपण कोसळून एक जखमी, जोरदार पावसात किरकोळ पडझडीच्याही घटना

Amit Kulkarni

काँग्रेसचे सरकार हे पक्षाचे नव्हे, गोवेकरांचे!

Amit Kulkarni

एकही गाव पाण्यासाठी तळमळू नये यासाठी प्रयत्न

Amit Kulkarni

पश्चिम बगल रस्त्याच्या कामाला बाणावलीच्या नागरिकांचा विरोध

Omkar B

राज्यात 15 दिवस सक्तीचे लॉकडाऊन करा : संजय बर्डे

Omkar B