Tarun Bharat

मुख्याधिकारी कार्यपध्दती निषेधार्थ उद्या इस्लामपूर बंद

विकास आघाडी, शिवसेना, मनसेची हाक

इस्लामपूर / प्रतिनिधी

शहरातील भुयारी गटारची कामे सुरु करण्यावरून बुधबारी नगरपालिकेच्या सभेत दोन्ही गटांच्या नगरसेवकांत राडा झाला. मुख्याधिकारी कामे सुरु करीत नसल्याचा आरोप विकास आघाडी, शिवसेना यांचा आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नगरपालिका आवारात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

नगरपालिका आवाराला पोलिस छावणीचे स्वरूप आले. पोलिसांनी नगरसेवकांना ताब्यात घेतले. यानिषेधार्थ विकास आघाडी, शिवसेना व मनसेने शहर बंदचे आवाहन केले आहे. तीन वेळा तहकूब होवून चौथ्यांदा झालेल्या या सभेत भुयारी गटारची कामे सुरु करण्यावरुन विकास आघाडी, शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे सर्वसाधारण सभेला दुपार पासून आंदोलनाचे स्वरुप आले. विकास कामांवर चर्चा कमी आणि घोषणाबाजी अधिक होवून सभा गुंडाळावी लागली. या सभागृहाची मुदत संपण्यास अवघे तीन आठवडे राहिले आहेत. पाय उतार होता होता, विकास आघाडी, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपले खरे रूप दाखवले. हमरी- तुमरी, धक्काबुक्की, बोंबाबोंब, आरडा-ओरडा याचेच प्रदर्शन शहरवासीयांनी पाहिले. गेल्या काही महिन्यापासून सर्वसाधारण सभा व विशेष सभा तहकूबीचा खेळ सुरु आहे. यामध्ये आणखी भर पडली.

सभा संपल्यानंतर दोन्ही गटाचे समर्थकही आक्रमक झाले. त्यांनी ही घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील आपल्या दालनात आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या दालनात थांबून होते. अखेरीस विकास आघाडी, शिवसेनेचे संतप्त नगरसेवक आणि पोलीस यांच्यातच जुगाड लागले. नगरसेवकांना रोखताना आणि आवारातील गर्दी हटवताना पोलीसांना नाकीनऊ आले. धरपकडीवेळी काही पोलीसांना हाता-पायाला मार लागला. तर मुख्याधिकारी दालनाची काच फुटली. सुमारे सहा तास केवळ गोंधळ आणि त्यातून तणाव असेच वातावरण होते.

गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पोलीस ताब्यात घेवून गेल्यानंतर नगराध्यक्ष दालनात विकास आघाडी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी एकत्र आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी या घटनेच्या निषेधार्थ (गुरुवारी) शहर बंद ठेवण्याची घोषणा केली. यामध्ये विजय पवार यांच्यासह मनसे ही सहभागी होईल, असे शहराध्यक्ष सनी खराडे यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान अजित पाटील यांनी राष्ट्रवादी मुख्याधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी नगरसेवक विजय कुंभार, सतेज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

महाविकास आघाडी आणि भाजपामध्येच होणार ग्रामपंचायतीच्या काट्य़ाच्या लढती

Archana Banage

फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाईसाठी सांगलीत ऊस वाहतूकदारांची ट्रॅक्टर रॅली

Archana Banage

गरिब, उद्योजकांना तातडीने मदत करा : पृथ्वीराज चव्हाण

Archana Banage

सांगली : शिवतीर्थ मंडळचा यंदा सिंहगड किल्ला व हालता देखावा

Archana Banage

‘वीज कानेक्शन तोडण्यापूर्वी मुदत न मिळाल्यास महावितरण कार्यालय फोडणार’

Archana Banage

…ही दिल्लीकरांची इच्छा : जयंत पाटील

Archana Banage