Tarun Bharat

मुचंडीत भरदिवसा साडेचार लाखांची चोरी

चोऱया, घरफोडय़ांची मालिका सुरूच : घटनेमुळे परिसरात खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहर व तालुक्मयात चोऱया, घरफोडय़ांची मालिका सुरूच आहे. गुन्हेगारांनी पोलीसदलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. भर दिवसा बंद घरे लक्ष्य बनविण्यात येत आहेत. बुधवारी दुपारी मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून साडेचार लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे.

चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मुचंडी येथील शब्बीर मोकाशी यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला असून घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शब्बीर हे एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांचा मुलगा कामावर गेला होता. त्यावेळी पत्नी गावातील नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून त्या घराबाहेर पडल्या. केवळ तासाभरात 2.30 वाजता शब्बीर यांच्या पत्नी आपल्या घरी परतल्या त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

चोरटय़ांनी पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला आहे. कपाटातील सात तोळे सोन्याचे दागिने, 10 तोळे चांदी व 50 हजार रुपये रोख रक्कम असे साडेचार लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात सध्या होत असलेल्या चोऱया, घरफोडय़ांपैकी बहुतेक गुन्हे पाठीमागील दरवाजा फोडूनच करण्यात आले आहेत.

कर्ज भरायचे होते

सोसायटीत काढलेले कर्ज भरण्यासाठी शब्बीर यांच्या मुलाने एटीएममधून 50 हजार रुपये काढले होते. सोसायटी बंद आहे म्हणून ती रक्कम घरी ठेवण्यात आली होती. शब्बीर यांच्या मुलीचे लग्न झाले आहे तीने आपले दागिनेही माहेरी ठेवली होती. मुलीचे दागिनेही चोरटय़ांनी पळविले आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

सुरेश अंगडी यांचे दिल्लीत स्मारक निर्माण करा

Omkar B

शुक्रवारी कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले

Patil_p

तालुक्मयात ‘लम्पिस्किन डिसीज’चा वेगाने फैलाव

Omkar B

शाळा दहशतीखाली, पोलीस बंदोबस्तात वाढ

Amit Kulkarni

राजकीय इच्छाशक्ती अभावी सीमाप्रश्न प्रलंबित

Amit Kulkarni

ग्राम पंचायत कर्मचाऱयांच्या वेतनासाठी 382 कोटी तात्काळ मंजूर करा

Patil_p