Tarun Bharat

मुचंडी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता वडेयार

उपाध्यक्षपदी संदीप जक्काणे यांची निवड

किणये : मुचंडी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता सिद्धू वडेयार यांची बिनविरोध तर उपाध्यक्षपदी संदीप चंद्रकांत जक्काणे यांनी बाजी मारली आहे.

यमकनमर्डी मतदार क्षेत्राचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व अरविंद कारची, पांडू मन्नीकेरी यांच्या प्रयत्नातून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.  अध्यक्षपदासाठी अनिता वडेयार यांचा केवळ एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी संदीप चंद्रकांत जक्काणे व संजय चौगुले या दोघा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये संदीप जक्काणे यांना 10 मते तर संजय चौगुले यांना 5 मते मिळाली. संदीप जक्काणे हे 5 मते अधिक घेऊन विजयी झाले. ग्राम पंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून नामकार उपस्थित होते. यावेळी पीडीओ जयमाला याही उपस्थित होत्या. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ग्राम पंचायतीचे सर्व 15 सदस्य हजर होते.

Related Stories

फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अधिवेशन

Omkar B

नव्या वर्षात मनपाचे कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा

Amit Kulkarni

रियाच्या मृत्यूची कसून चौकशी करा

Patil_p

म. ए. समिती महिला आघाडीची आयसोलेशन सेंटरसाठी मोफत सेवा

Amit Kulkarni

महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त

Rohit Salunke

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ‘ती’ अनधिकृत खोकी हटविली

Tousif Mujawar