Tarun Bharat

मुडलगीतील दोन हॉस्पिटल्सना टाळे

Advertisements

6 स्कॅनिंग सेंटरवर छापे ः 7 मृत भ्रृणप्रकरण

वार्ताहर/ घटप्रभा

गोकाकपासून जवळच असलेल्या व तालुक्याचे ठिकाण असणाऱया मुडलगी येथील बसस्थानकाशेजारील ओढय़ामध्ये 7 मृत भ्रृण आढळून आल्याने जिल्हय़ात एकच खळबळ उडाली होती. या माणुसकीला काळीमा फासणाऱया घटनेनंतर तपासासाठी आरोग्य विभागाने विशेष पथकाची स्थापना केली होती. शनिवारी मुडलगी पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करताना दोन हॉस्पिटल्सना टाळे ठोकले. तसेच 6 स्कॅनिंग सेंटरवर छापा टाकून चौकशी चालविली. सविस्तर चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मुडलगी येथील बसस्थानकानजीक असलेल्या ओढय़ामध्ये 5 प्लास्टिक भरणींमध्ये 7 मृत भ्रृण आढळून आले होते. या धक्कादायक घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी कसून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार आरोग्य विभागाने चौकशीचा धडाका लावला आहे. शनिवारी बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणे यांनी तात्काळ मुडलगीला भेट देऊन माहिती घेतली. यानंतर आरोग्य विभाग व पोलिसांनी तपासकार्य हाती घेतले. त्यानुसार सीपीआय श्रीशैल ब्याकूड, पीएसआय हालाप्पा बालदंडी व आरोग्य अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली मुडलगी शहरातील 6 स्कॅनिंग सेंटरवर अचानक छापा टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

याचबरोबर शहरातील व्यंकटेश मॅटर्निटी व नवजीवन हॉस्पिटलवर धाड टाकून तपास केला. संशय आल्याने सदर दोन्ही हॉस्पिटल्सना टाळे ठोकण्यात आले आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी कागदपत्रे ताब्यात घेतली असून आरोग्य विभाग पोलिसांच्या मदतीने पुढील तपास करत आहे. या कारवाईमुळे मुडलगी व गोकाक परिसरातील बेकायदा कृत्य करणाऱया अशा हॉस्पिटलांचे धाबे दणाणले आहेत.

Related Stories

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाडमध्ये जुन्या-नव्यांना संधी

Omkar B

जादा पाणी उपशाकरिता पंप बसविण्याचे काम अंतिम टप्यात

Patil_p

जैव विविधतेची जोपासना करणे प्रत्येकाचे कर्तव्य

Omkar B

बाणावलीतील विकासकामांत खो घालण्याचा प्रयत्न

Patil_p

जीएसएसची कराटेपटू सृष्टी जाधवला सुवर्ण

Amit Kulkarni

आतापर्यंत 20 कोटी घरपट्टी जमा

Patil_p
error: Content is protected !!