Tarun Bharat

मुतगा ग्रा. पं. अध्यक्षपदी भालचंद्र पाटील

Advertisements

वार्ताहर / सांबरा

मुतगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास आघाडीचे भालचंद पाटील  निवडून आले तर रुक्मिणी सिंगारी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रा. पं. च्या अध्यक्षपदासाठी सामान्य पद राखीव आल्याने अनेक जण अध्यक्षपदासाठी इच्छूक होते. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार, याबद्दलची ग्रामस्थांची उत्सुकता लागून रहिली होती. येथील सदस्य संख्या 19 असून ग्रा. पं. च्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे 14 सदस्य निवडून आले होते.

त्यामुळे ग्रामविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भालचंद्र पाटील व सुनील चौगुले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केले. त्यानंतर मतपत्रिकाद्वारे गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये भालचंद पाटील यांना 10 मते मिळाली. तर सुनील चौगुले यांना 9 मतांवर समाधान मानावे लागले. तर उपाध्यक्षपदी रुक्मिणी सिंगारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी काम पाहिले.

यावेळी पंचायत विकास अधिकारी बसवंत कडेमनी उपस्थित होते. भालचंद्र पाटील यांच्या विजयासाठी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, ता. पं. माजी सदस्य शामराव पाटील, नारायण कणबरकरसह ग्रा. पं. सदस्य किरण पाटील, सुधीर पाटील, प्रभाकर पाटील, शाम मुतगेकर, बबिता पाटील, भारता पाटील, भाग्यश्री पाटील, स्नेहल पुजारी आदींनी परिश्रम घेतले.

निवडीनंतर भालचंद्र पाटील यांनी गावातील सर्व मंदिरांना भेट देत आशीर्वाद घेतला व गावातील सर्व वडिलधाऱयांचा आशीर्वाद घेऊन गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली.

चार सदस्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नाराजी

येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामविकास आघाडीचे 14 सदस्य निवडून आले होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भालचंद्र पाटील यांना 10 मते पडली. त्यामुळे उर्वरित चार सदस्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे शाम मुतगेकर यांनी आघाडीला पाठिंबा देत आघाडीशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

वाढत्या कोरोनामुळे पिरनवाडी परिसरात पुन्हा बंदोबस्त

Amit Kulkarni

वरदराज चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

विद्यार्थी दशेतील काळ हा जीवनाला दिशा देणारा

Amit Kulkarni

चोरीप्रकरणी चौघा जणांना अटक

Patil_p

आझमनगर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण नाही?

Patil_p

हत्तीच्या पिलाला पुनीत राजकुमार यांचे नाव

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!